Posts

डोळ्यातले पाणी !

1 )   डोळ्यातले पाणी थांबेन कसे , दुःखाची ओझर भरून येते , अस्तित्वाची चाहुल लागता , मनाची तारांबळ होते , जणू काही विशाल या वनात  पिल्लू   लहान अनाथ आई ची वाट पाहते. 2) डोळ्यातले पाणी थांबेना,  मज वाट तुमच्या पास येण्यास मिळेना,   अथांग आयुष्य हे तुमच्याविना प्रकाश यात दिसेना, 

प्रेम

मज  तुमच्यासारखे ,  तुमच्याशिवाय कोण नाही,  या प्रेमाविना आयुष्य हे थकले असेच काही,  कोणा जन्मी पुन्हा भेट आपली परत व्हावी  , सेवा तुमची मज या हातून घडावी,    प्रत्येक क्षण डोळ्यात दिसून यावा,   असाच हा सोहळा परत जगण्यास लाभावा,   तुमचे हास्याचा आनंद न आता या अंगणात दिसावा.

आठवणी

  ती पोकळी आता कधीच भरून न यावी ,  काळजातून आठवण तुमची यावी , प्रेमाचे हे नाते न जाने कधी पद्रात मिळावे , प्रत्येक जन्मी तुमचे ऋण फेडण्यास अपुरे पडावे , छत्र हरपले तुमचे आशीर्वाद परत लाभावे , अपुरे राहिले बरेच काही आता कोणाची ओढ नाही , संपले सगळेच आता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र जबाबदारीच्या आभाळाने भरलेले एवढेच हे आता अस्तित्व .